नागपूर शहर: मंदिरातील मुकुट चोरणारा कुख्यात घरफोडी बहाद्दर गजाआड, युनिट 2 ची कार्यवाही
3 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने एका मोठ्या कारवाईत, शहरातील हनुमान मंदिरातून चांदीचा मुकुट आणि छत्री चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. गिट्टीखदान, जगदीश नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरातून चांदीचा मुकुट आणि छत्री चोरीला गेली होती. या प्रकरणी फिर्यादी पवन विटले यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून आरोपी कृष्णा ठाकरे याला अटक केली.तपासादरम्यान असे समोर आले.