मोर्शी: मोर्शी ते वरुड मार्गावरील हिवरखेड जवळ, शेतात जाणाऱ्या रस्त्यावर मिळाला मृतदेह पोलिसांची टीम घटनास्थळावर दाखल
आज दिनांक एक नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता चे दरम्यान मोर्शी ते वरुड मार्गावरील हिवरखेड जवळ, एका शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मोर्शी पोलिसांची टीम देखील घटनास्थळावर दाखल झाली असून, पोलिसांकडून अत्यंत बारकाईने घटनेचा तपास सुरू आहे. वृत्त प्रकाशित होईपर्यंत मृतकाचे नाव कळू शकले नाही