नागपूर शहर: बजाजनगरमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७१ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी
बजाज नगर पोलीस स्टेशन हद्दीत वॉकहार्ट हॉस्पिटलजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक वासुदेवराव वाकळे (७१) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला, पायाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.