नागपूर शहर: नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक
शहराचा विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर महानगरपालिका , नागपूर सुधार प्रन्यास आणि MSIDC अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.