नागपूर शहर: बनावट अधिकारी बनून नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
नागपूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फसवणूक प्रकरणात आरोपी विजय रामचंद्र पटवर्धन (वय ३२) याला दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.आरोपीने स्वतःला नागपूर आणि औरंगाबादचा 'डेस्क तथा सर्वेक्षण अधिकारी' असल्याचे भासवून बनावट ओळखपत्रे तयार केली होती.