नागपूर शहर: नागपुरात जमावाचा राडा; पोलीस कामात अडथळा आणल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल
22 जूनला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावाचा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ताज हॉटेल समोरील परिसरात काही इसम एकमेकांना मारहाण करत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी उलट पोलिसांनाच धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नितीन सुभाष राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तौसिफ खान, फरहान खानसह एकूण ९ मुख्य आरोपी आणि त्यांच्या ३ साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन