फलटण: सुरवडी व फडतरवाडी येथील शेती पंप चोरीचे ६ गुन्हे उघडकीस; ४ लाख ४० हजारांच्या मुद्देमालासह तिघे पोलिसांच्या ताब्यात
Phaltan, Satara | Sep 12, 2024 सुरवडी व फडतरवाडी ता. फलटण येथील परिसरातून शेती पंप चोरी गुन्ह्याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी शेती पंप चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आणून ६ शेती पंप व २ दुचाकी आणि २ मोबाईल अशा ४ लाख ४० हजारांच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.फलटण ग्रामीण पोलीसांनी गुरुवार दि. २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता माहिती दिली.यापूर्वी रोहित शिंदे (रा. सुरवडी) यांनी शेती पंप चोरीला गेल्याची फिर्याद पोलीसांत दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.