रावेर: अकलूद गावाजवळील हॉटेल कोळीवाडा येथे बियर दिली नाही म्हणून तिघांची तरुणाला मारहाण, फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | May 24, 2025 अकलूद या गावाच्या जवळ हॉटेल कोळीवाडा आहे. या हॉटेलमध्ये चेतन नारायण भंगाळे वय ३८ हा तरुण होता त्याच्याकडे देवानंद कोळी, बंटी कोळी व उमेश बाविस्कर या तिघांनी बियर मागितली. त्यांनी बियर दिली नाही या रागातून या तिघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली तर यातील एकाने काहीतरी धारदार वस्तूने त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.