नागपूर शहर: नागपुरात लुटमार आणि वाहन चोरी करणारा तरूण गजाआड; सीताबर्डी पोलिसांची कारवाई: सुहास राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी 20 जूनला दुपारी 4:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलिसांनी लुटमार आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यात १९ वर्षीय आर्यन भगवान नंदेश्वर याला अटक केली आहे. आरोपीने आपल्या साथीदारांसह मिळून महाराजबाग परिसरात एका ६१ वर्षीय व्यक्तीला धमकावून त्यांची रोख रक्कम, मोबाईल आणि बूट लुटले होते. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी दिली आहे