नागपूर शहर: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: खासगी ट्रॅव्हल्सची अज्ञात ट्रकला धडक, २५ प्रवासी जखमी
समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. पुण्यावरून नागपूरच्या दिशेने जाणारी ही ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोर चालणाऱ्या एका अज्ञात ट्रकला पाठीमागून धडकली. या दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधील २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी १३ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.