भंडारा: गोबरवाही पोलिसांची अवैध दारू अड्ड्यावर मोठी कारवाई, 1.16 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोबरवाही पोलिसांनी पाथरी शिवारातील अवैध दारू अड्ड्यावर छापा मारून 360 किलो सडवा मोहफूल रसायन, ड्रम आणि जळाऊ लाकडाचा 1.16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी डिगांबर गोमाजी राऊत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल.