अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता सरकारने मदतीचे हात पुढे केले असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. "सप्टेंबरपर्यंतच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे, तसेच दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाचे पैसे देखील वितरीत होऊ लागले आहेत," अशी माहिती दिली. मंत्री पाटील यांनी पुढे सांगितले की, "शेती, जमीन, जनावरे, कोंबड्या, घरकुल, शाळा आदींच्या नुकसानीसाठी स्वतंत्र अनुदान देण्यात आले आहे.