नागपूर शहर: कळमन्यात दोन टिंबर ट्रेडर्सला भीषण आग; सव्वा कोटींचे साहित्य जळून खाक
कळमना परिसरातील चिखली ले-आऊट येथे असलेल्या दोन मोठ्या टिंबर ट्रेडर्सला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत लाकूड, मशिनरी आणि फर्निचर जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ५ मे ला पहाटे १:२० वाजताच्या सुमारास 'रामेश्वर टिंबर ट्रेडर्स' आणि 'कमला टिंबर ट्रेडर्स' या दोन प्रतिष्ठानांना आग लागल्याची माहिती अग्निशमन केंद्राला मिळाली.