नगरपालिका निवडणुकीतील थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अकोट नगरपालिकेसाठी एकूण 53 हजार 612 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला ही टक्केवारी 65.12 % असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अनेकांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाल्याने आता निकालाची प्रतीक्षा राहणार आहे.मात्र निकालासाठी उमेदवारांसह मतदारांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने पुढील काही दिवस निवडणुक चर्चा रंगणार आहे.