अकोला: अन्वी रेल्वे गेटवर उड्डाणपूल व अंडरपासाचे खासदार धोत्रे यांच्या हस्ते भूमिपूजन; ५० कोटींचा निधी मंजूर
Akola, Akola | Jul 6, 2025 दि. ६ जुलै रोजी अन्वी रेल्वे गेटवर उड्डाणपूल व अंडरपास उभारणीच्या कामाचे भूमिपूजन आज दुपारी २ वाजता करण्यात आले. या कामासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अनुप धोत्रे, प्रवीण हगवणे, अनिल गावंडे, श्रीकृष्ण ठोकळ उपस्थित होते. प्रास्ताविक हगवणे यांनी, सूत्रसंचालन ठोकळ यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत ठाकरे यांनी केले.