आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना, तरुणांनी व्यसनमुक्त राहून भक्तीमार्ग स्वीकारावा आणि आपले जीवन सुखी व सुसंस्कृत करावे, या उदात्त उद्देशाने धामणगांव रेल्वे ते शेगाव पायदळ वारीचे आयोजन गेल्या १३ वर्षांपासून नियमितपणे करण्यात येत आहे.नवीन वर्षाच्या निमित्ताने धामणगांव रेल्वे येथील शास्त्री चौक स्थित श्री गजानन महाराज मंदिराचे भक्त मित्रपरिवार तसेच जय मातादी ऑटो युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने या पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले. यावर्षी या वारीत