अमरावती: निराधारांना आधार देत प्रविण पोटे पाटील यांची दिवाळी साजरी
दिवाळीचा सण हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा असतो. या सणाचे खरे स्वरूप समाजातील दुर्लक्षित आणि निराधार घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, श्रेयस पोटे पाटील व श्रुतीताई पोटे पाटील यांनी आज १९ ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी बारा वाजता दरवर्षीप्रमाणे यंदाही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.अमरावती महानगरपालिकेच्या आधार केंद्रात वास्तव्य करणाऱ्या निराधार नागरिकांसोबत दिवाळी साजरी करत पोटे पाटील कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले...