घनसावंगी: तीर्थपुरी ठिबक कंपनीला भीषण आग; घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही
जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील ड्रीपसील इरिगेशन सिस्टिम लिमिटेड या ठिबक निर्मिती कंपनीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत सुमारे १७० टन रॉ मटेरियल आणि दोन मशिनरी जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कामगारांनी धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहताच अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. दरम्यान, कंपनीचे मालक शशिकांत बोबडे यांनी अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून आग लावल्या