निम्न पेढी प्रकल्पामध्ये बाधीत झालेल्या गावांचे दर्जेदार पुनर्वसन करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्या मान्य केल्या आहेत. निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीला शासनाने मान्यता दिल्याने या कामास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे बाधित गावातील नागरिकांनी पुनर्वसित गावात तातडीने स्थलांतरीत व्हावे, या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आवाहनाला बाधीत गावाच्या सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आज १६ ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी