जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरूच असून मतोबा महाराजांच्या मूर्ती नंतर काही दिवसांपूर्वी येथील दोन मेडिकल दुकानाचे शटर फोडून चोरी करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. नैताळे येथील शेतकरी श्री. लहानु फकीरा बोरगुडे यांची पिकअप गाडी (क्रमांक MH 15 DK 3277) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.