नागपूर शहर: सीताबर्डी हद्दीत नशेत असलेल्या व्यक्तीच्या मदतीऐवजी केली चोरी; एकाला अटक, तर साथीदार फरार
नशेत धूत असलेल्या एका व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याच्याच वाहनाची आणि सामानाची चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. सैय्यद सोहेल सैय्यद रफिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर त्याचा फरार साथीदार 'आफताब अली उर्फ फडफड' याचा पोलीस शोध घेत आहेत.