नागपूर शहर: वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांकडून अटक; चार दुचाकी जप्त: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 11 जूनला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार कलमना पोलीस ठाणे हद्दीत अलीकडच्या काळात वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकाने अत्यंत सक्रियता दाखवत वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला गजाआड केले आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.