नागपूर शहर: हुडकेश्वरमध्ये घातक शस्त्र बाळगणाऱ्याला अटक
25 जून ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर परिसरात हातामध्ये लोखंडी चाकू घेऊन धूमाकूळ घालणाऱ्या संदेश उर्फ लवंग सुभाष पाटील या इसमाला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. राजापेठ बस स्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीकडून ५०० रुपये किमतीचा चाकू जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.