नागपूर शहर: नागपुरात हॉटेलवर धाड; हुक्का पार्लरचा पर्दाफाश, ४९ जणांवर गुन्हा : दीपक अग्रवाल पोलीस उपायुक्त
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी 2 जुलै ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,सदर भागातील 'हाऊस ऑफ बीअर' हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा आणि सदर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. मध्यरात्री केलेल्या या धाडीत ४३ ग्राहक हुक्का पिताना रंगेहात सापडले. पोलिसांनी २३,०६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, हॉटेल संचालक गुरुप्रीतसिंग खंडूजा, वेटर्स आणि ग्राहकांसह एकूण ४९ जणांवर सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.