सेनगाव: शेतकऱ्यांना 18 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही,शेतकरी नेते डाॅ रमेश शिंदे
शेतकरी नेते डॉ रमेश शिंदे हे केसापुर या ठिकाणी स्मशानभूमीतील सरणावर बसून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषण करत असून जोपर्यंत 18 हजार 500 रुपयांचा रुपयाची मदत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आज दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता शेतकरी नेते डॉ रमेश शिंदे यांनी आज दिला आहे.ओला दुष्काळ तसेच कर्जमाफी सह विविध मागण्यासाठी शिंदे हे सरनावर उपोषणाला बसले आहेत.