आप पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी अहमदपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले की, जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आप पार्टी स्वबळावर उतरून सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे.नलबले म्हणाले, “संघटन कमी असले तरी जनतेचा विश्वास आमच्याकडे आहे. जनतेतून आलेलाच उमेदवार जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करू शकतो, हीच आमची भूमिका आहे.”अहमदपूर नगरपरिषद व जिल्हा परिषद गटातील सर्व जागांवर पार्टी आपले उमेदवार उभे करणार असून काही इच्छुकांनी संपर्क साधला आहे.