म्हसळा: म्हसळा एसटी स्थानकात भुरट्या चोराने वृद्धेचे ७ हजार रुपयांची पिशवी पळवून केला पोबारा
पोलिसांनी केले जेरबंद
Mhasla, Raigad | Jun 28, 2025 म्हसळा तालुक्यातील चंदनवाडी येथील वयोवृद्ध महिला रुक्मिणी रामजी धुमाळ वय वर्षे ६०, राहणार चंदनवाडी या दिनांक २६ जुन २०२५ रोजी दुपारी दोन वाजता म्हसळा बाजार पेठेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आल्या असता त्या पुन्हा परतीचा प्रवास करत असताना भुरट्या चोराने दिवसा ढवळया वयोवृद्ध महिलेचे पिशवीतील ७ हजार रुपये पळवून धुम ठोकल्याची घटना घडली.घटनेची खबर म्हसळा पोलिसांना मिळताच आरोपीच्या वर्णना नुसार काही अवधीतच आरोपी अल्ताफ आखलाख तालिब याला जेरबंद केले