नागपूर शहर: नागपुरात घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक जण अटकेत, चाकू जप्त
5 जुलै ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना घातक शस्त्र (चाकू) बाळगल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. किशोर बंडू सहारे (वय ३३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस गस्त घालत असताना जनता वाईन शॉपच्या मागे, कमाल चौक, शनीचरा मार्केट जवळ आरोपी संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून, पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.