जालना: रेल्वे स्थानक चौकातील टपरीधारकांवर कारवाई; महापालिकेविरोधात संतापाचा उद्रेक*
Jalna, Jalna | Sep 29, 2026 जालना शहरातील रेल्वे स्थानक चौकात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत टपऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हातावर पोट असलेल्या टपरीधारकांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कारवाईविरोधात टपरीधारकांनी महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. "आम्ही दिवसभर कष्ट करून दहा-वीस रुपये कमावतो. दिवसभर काम केले तर संध्याकाळी आम्हाला खायला मिळते. मात्र, महानगरपालिकेने आमच्या टपऱ्या हटवल्याने आता आम्ही खायचे काय?" असा संतप्त सवाल टपरीधारकांनी उ