यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे अनेक तलावांमध्ये पाणीसाठा कमी असून, भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेश विसर्जनात आपण एक संवेदनशील निर्णय घेऊया.
मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन न करता त्या जतन करून ठेवूया, तर लहान मूर्तींचे प्रतीकात्मक विसर्जन करूया. शक्यतो आपल्या परिसरातच विकेंद्रित पद्धतीने विसर्जनाची व्यवस्था करूया.
या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या गणेश मंडळांचा विशेष सत्कार करण्यात येईल.
चला, यंदाचा उत्सव श्रद्धेने साजरा करताना पाणी वाचवूया… पर्यावरणाला साथ देऊया… आणि भविष्याचीही काळजी घेऊया.
#visarjan #savewater #ecofriendlyvisarjan #nandednews #nanded
418 views | Nanded, Maharashtra | Sep 24, 2026