नागपूर शहर: कळमना परिसरात आयशर गाडीला किरकोळ आग; २० हजारांचे नुकसान, लाखो रुपयांची मालमत्ता बचावली
[5/23, 8:
कळमना अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील चिखली ले-आऊट एका स्मॉल इंडस्ट्रियल एरियामध्ये उभ्या असलेल्या आयशर गाडीला आज संध्याकाळी अचानक आग लागली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तात्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.२३ मे रोजी संध्याकाळी ६:३० वाजता ऋतिक शाहू यांनी स्वतः अग्निशमन केंद्रात जाऊन या आगीची माहिती दिली.