तुमसर: बिनाखी येथे राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण पार पडला
राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत, तुमसर तालुक्यातील बिनाखी येथे आज दि.26 सप्टेंबर रोज शुक्रवारला दुपारी 2 वाजता. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमात शेतकऱ्यांना भात पिकाचे व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी आदित्य तलमले, उप कृषी अधिकारी विलास फासे, सरपंच देवेंद्र मेश्राम, उपसरपंच राजेंद्र बघेले, पोलीस पाटील युवराज बघेले प्रामुख्याने उपस्थित होते.