भोकरदन: अनवा महादेव मंदिरात मास टाकणारा आरोपी जेरबंद सहा.पोलीस निरीक्षक माने यांनी पारध पोलिसांनी दिली माहिती
आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे येथे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी माहिती दिली,की 21 सप्टेंबर रोजी अनवा येथे हेमाडपंथी महादेव मंदिरात अज्ञात व्यक्तीने मास टाकल्याची फिर्याद दाखल झाली होती या फिर्यादीवरून सदर आरोपीला आज दि.23 सप्टेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याचे नाव नंदकिशोर वडगावकर याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्याला अटक केली आहे.