वसई: अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केलेल्या सराईत आरोपीला अर्नाळा गावातून अटक
Vasai, Palghar | Apr 20, 2024 अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केलेल्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.अर्नाळा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणारा सराईत आरोपी मुकेश उर्फ माका विनोद मांगेला (३१) याला परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त यांनी पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रांच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार केले होते.