फलटण नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याने प्रचाराचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. गुरुवारी दोन्ही पक्षांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या रंगल्या. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य सांगता सभा घेत प्रचाराची सांगता केली, तर शिवसेनेने सायंकाळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत भाजपवर जोरदार टीका करत वातावरण अधिक तापवले. रात्री नऊ वाजेपर्यंत चाललेल्या शिवसेनेच्या प्रचार सभेत मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.