लातूर: पिसाळलेल्या लांडग्याचा अखेर अंत!देवणी परिसरातील नागरिकांचा दिलासा; बारा जणांवर हल्ला करणाऱ्या लांडग्याला लोकांनीच ठेचलं
Latur, Latur | Nov 1, 2025 लातूर -लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या पिसाळलेल्या लांडग्याचा अखेर आज सकाळी अंत झाला. देवणी खुर्द गावात पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन नागरिकांवर या लांडग्याने पुन्हा चढाई केली. मात्र, यावेळी गावकऱ्यांनी एकत्रितपणे धैर्य दाखवत त्याला वेढा घातला आणि शेवटी लांडगा लोकांनी ठेचल्याने मारहाणीत मृत झाला.