नागपूर शहर: जुन्या प्रेयसीच्या 'हाय' मेसेजवरून दोन गटांत थरार; चाकूबाजी आणि हाणामारी: संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 18 मे ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरील एका साध्या 'हाय' मेसेजमुळे दोन गटांत भीषण संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या यशोधरानगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.