हिंगोली: शहरातील शाळा परिसरातील पान टपऱ्यांकडून दंड वसूल
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा पोलीस यांनी हिंगोली शहरातील शाळांच्या चारही बाजूने 100 मीटरच्या परिसरातील 10 पानटपऱ्यावर धडक कार्यवाही करुन 2700 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शाळेच्या आवारातील पान टपऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत आदेश जारी केले होते.