सेनगाव: माझोड सह विविध ठिकाणची जनावरे चोरी करणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
सेनगांव तालुक्यातील गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत माझोड तसेच हत्तापाटी व सवड येथील जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून 4.50 लाखाचा रक्कम जप्त केली. तसेच सदर प्रकरणातील आरोपी हे शेतातील आखाड्यावर बांधली जनावरे चोरत असल्याने गोरेगांव सह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर आज आरोपी रवी राऊत राहणार सेनगांव यास अटक केली व त्याची अधिक चौकशी केली असता त्याने इतर दोघांसोबत जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.