जालना: शहागड, टेंभुर्णी तसेच जिल्ह्यातील नद्या कोरड्या, मराठवाड्यावर पाणीटंचाईचा सावट, मोठ्या पावसाची प्रतीक्षा
Jalna, Jalna | Jul 17, 2026 आज दिनांक 17 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील शहागड टेंभुर्णी यासह जिल्ह्यातून व परिसरातून वाहणाऱ्या नद्या या कोरड्या ठक्क पडल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे, यामध्ये गोदावरी, पूर्णा ,दुधना, गिरजा,केळना,कुंडलिका,मुसा,शिवभद्रा या प्रमुख नद्यांमधील पाणी प्रवाह मोठ्या प्रमाणात घटला असून ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून दृश्य घेतले असता या नद्या कोरड्या टक पडल्या आहे, आणि त्यामुळे शेतकरी पशुपालक आणि ग्रामीण भागात पाणीटंचाईचा संकट उभा टाकला आहे.