फलटण: महावितरण कंपनीच्या मेन लाईनच्या अर्थिंगचा करंट जनावरांच्या गोठ्यात; फलटण तालुक्यात सासवड येथे सहा गाईंचा मृत्यू
Phaltan, Satara | Oct 22, 2025 फलटण तालुक्यातील सासवड येथील किसन निवृत्ती जाधव या शेतकऱ्याच्या सहा गाईंचा विजेचा धक्का लागून मृत्यु झाला. ही दुर्दैवी घटना दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे जाधव कुटुंबातील सदस्य अवघ्या पाच मिनिटांपूर्वी गाईंचे दूध काढून गोठ्यातून बाहेर पडले होते. घटनास्थळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी भेट दिली असून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. राज्य सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा शब्द दिला.