पनवेल: आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते पनवेल येथे शाळा क्रमांक ७ येथे फिरत्या डिजिटल दवाखान्याच्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन
Panvel, Raigad | Oct 17, 2025 रूग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून प्रतिक देवचंद बहिरा यांच्या माध्यमातून आज शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास पनवेल महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सात येथे फिरत्या डिजिटल दवाखान्याच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची उद्घाटन स्थानिक भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार ठाकूर यांनी आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिला. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक देखील उपस्थित होते.