नागपूर शहर: गिट्टीखदान पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडीचा अवघ्या दोन तासांत छडा: विजय दिघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी पाच मेला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार गिट्टीखदान पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचे दर्शन घडवत जाफर नगर परिसरातील चोरीच्या मोठ्या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासात छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ओसामा पटका या सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चोरीचा २ लाख ३७ हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली आहे.