पांडुरंग संस्थान दे. माळी येथील जिर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या द्वितीय वर्धापन सोहळ्याचे औचित्य साधून ४ जानेवारी २०२६ रोजी भव्य कुस्त्यांची आमदंगल'पार पडली.क्रांतीसूर्य तालीम संघ आणि पांडुरंग संस्थानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीसूर्याच्या मैदानात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील वाघासारख्या मल्लांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले आणि उपस्थित हजारो कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.या कुस्ती दंगलीचे दिमाखदार उद्घाटन मा.आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.