नागपूर शहर: गुंतवणूक दुप्पट-चौपट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: अभिजीत पाटील, सहायक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 19 जून ला दुपारी 4:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सामान्य नागरिकांना गुंतवणुकीवर दुप्पट-चौपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळीचा म्होरक्या परवेझ अहमदसह एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे