रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाढत्या येव्यामुळे आज दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ७.०० वाजता धरणाची एकूण दोन वक्रद्वारे उघडण्यात आली असून, रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोन्ही द्वारे १० सेंटिमीटर ने उघडण्यात आली असून, एकूण ६२९.२२ क्यूसेक्स (१७.८२ क्यूमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.