लातूर: काँग्रेस शहराध्यक्ष किरण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन,नागरिकांच्या केल्या तपासण्या,औषध मोफत
Latur, Latur | Oct 9, 2025 लातूर,- विवेकानंद चौक येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज शहराध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या हस्ते पार पडले.या शिबिरात डॉ. घाटे, डॉ. भालेराव, डॉ. श्याम शितोळे, डॉ. सोहेल पटेल आदी प्रख्यात एम.डी. डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांची तपासणी करण्यात आली. अशी माहिती काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सायंकाळी साडेपाच वाजता देण्यात आली आहे.