आचारसंहिता लागलेली असताना विकास कामांची निविदा काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी उपमहापौर भगवान वाघमारे आणि परभणी काँग्रेसच्या वतीने परभणी शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आला. जवळपास 550 कोटींचे कामाची निविदा काढून प्रशासक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर पत्रकार परिषदेत ताशेरे ओढले.