सेनगाव: दोन्ही तालुक्यांचा वाढीव अतिवृष्टी यादीत समावेश झाला, बनवाबनवी मी आयुष्यात कधी केली नाही,आमदार मुटकुळे
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना मी इमानदाराच्या पोटी जन्माला आलो असून बनवाबनवी कधी केली नसल्याचे वक्तव्य केले आहे. अतिवृष्टीच्या वाढीव निधीमधून हिंगोली व सेनगांव तालुका वगळण्यात आल्यानंतर आमदार मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधून दोन्ही तालुके यादीमध्ये समाविष्ट केल्याचे त्यांनी आज दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2 वाजता सांगितले आहे.