रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक किल्ले रायगड च्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 427 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते. यावेळी रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन,अभिषेक व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी महाड पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी डॉ.स्मिता पाटील, माजी जि.प सदस्या मानसी दळवी, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे यांसह विविध अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य उपस्थित होते.